१२ वी निकालाची प्रतीक्षा संपणार! ‘या’ दिवशी जाहीर होण्याची शक्यता; असा करा रिझल्ट चेक

---Advertisement---

 

पुणे: राज्यातील सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून घेण्यात आलेल्या १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल अंतिम टप्प्यात असून, तो मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
निकालाची तयारी पूर्ण
मंडळाकडून निकालाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठीची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.


दोन माध्यमांद्वारे निकाल उपलब्ध
यंदा विद्यार्थ्यांना दोन प्रमुख पर्यायांद्वारे निकाल पाहता येणार आहे:
अधिकृत वेबसाइट
DigiLocker (येथून डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करता येईल)
असा चेक करा तुमचा रिझल्ट
अधिकृत वेबसाइटला भेट द्या
‘HSC Result’ लिंकवर क्लिक करा
रोल नंबर आणि आईचे नाव (किंवा आवश्यक माहिती) भरा
सबमिट केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल
मार्कशीट डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवा


या वेबसाइट्सवर पाहता येईल निकाल:

mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
निकाल पाहण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपले हॉल तिकीट तयार ठेवावे. तसेच अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासत राहावी, कारण निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---