“नवनीत राणा सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन: विजय वडेट्टीवारांची टीका; पगारापेक्षा जास्त बोलू नये म्हणत रवी राणा यांचाही पलटवार”

---Advertisement---

 

नागपूर: राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आता खालच्या पातळीवर पोहोचला असून वैयक्तिक चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार नवनीत राणा यांच्या अभिनय क्षेत्रातील पार्श्वभूमीवरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे नवा वाद पेटला आहे. या टीकेला आमदार रवी राणा यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.


​काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
​आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “नवनीत राणा पंतप्रधान मोदींना ‘ठोक’ समजतात आणि आम्हाला ‘चिल्लर’. त्या ‘सी-ग्रेड’ चित्रपटाच्या प्रसिद्ध हिरोईन आहेत, त्यामुळे त्या स्वतःला ‘ग्रेट’च समजणार. त्यांच्या दृष्टीने आमच्यासारखे लोक चिल्लरच आहेत.” वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


​रवी राणांचा तिखट पलटवार
​आपल्या पत्नीवर झालेल्या या टीकेचा समाचार घेताना आमदार रवी राणा यांनी वडेट्टीवारांना त्यांच्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला. राणा म्हणाले, “एखाद्या महिलेबद्दल अशी हीन दर्जाची भाषा वापरणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. वडेट्टीवारांनी आपल्या लेव्हलनुसार वागले पाहिजे. जेवढा पगार मिळतो, तेवढेच बोलले पाहिजे. आपली पातळी सोडून वायफळ बडबड करून वडेट्टीवारांनी स्वतःचा कचरा करू घेऊ नये.”

​रवी राणा यांनी पुढे नमूद केले की, सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांचा आदर राखणे गरजेचे आहे, मात्र वडेट्टीवार आपली राजकीय मर्यादा ओलांडत आहेत. या वादामुळे सध्या विदर्भातील राजकारण चांगलेच तापले असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---