Crime News : सरकारी निवृत्त अधिकारी निघाला डिजिटल अटकेचा सूत्रधार

---Advertisement---

 

Crime News : डिजिटल अटकेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका सायबर फसवणूक टोळीचा भंडाफोड करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणात एक निवृत्त सरकारी अधिकारीच टोळीचा सूत्रधार असून, त्याच्या मुलासह पाच जणांना अटक करण्यात आली. या टोळीने ज्येष्ठ नागरिकांची दोनशे कोटींनी फसवणूक केल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांच्या सायबर विभागाचे पोलिस आयुक्त हिमांशू कुमार यांनी सांगितले, बिहारमधील मुझफ्फरपूर येथे एका वृद्ध व्यक्तीची ६७ लाख रुपयांची डिजिटल अटकेद्वारे फसवणूक केली होती. याप्रकरणाचा तपास करताना निवृत्त सरकारी अधिकारी आणि इतर आरोपींची नावे समोर आली.

या टोळीचा सूत्रधार बिहार सरकारचा एक निवृत्त सांख्यिकी अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याला त्याच्या मुलासह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख ६० वर्षीय प्रियरंजन शर्मा आणि त्याचा मुलगा अनंत अमिश अशी पटली आहे. पोलिसांनी पाटणा येथील राजीव नगरमधील त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली. तपासात आरोपींच्या बँक खात्यांमध्ये २०० कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचे पुरावे आढळले आहेत.

सीबीआय अधिकाऱ्याच्या नावाखाली लुटले

आरोपी सीबीआय, पोलिस आणि दूरसंचार विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना ‘डिजिटल अटकेची’ धमकी देत होते. अलीकडील एका प्रकरणात, काझी मोहम्मदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला १२ दिवस फोन करून धमकी देण्यात आली. आरोपींनी त्यांचे आधार कार्ड दहशतवादी कारवायांमध्ये वापरले गेल्याचा दावा करून फसवणूक केली. अटकेच्या भीतीने, पीडित व्यक्तीने विविध खात्यांमध्ये ६७लाख रुपये हस्तांतरित केले होते. ही टोळी दररोज अंदाजे ४ कोटी रुपयांचे व्यवहार करत होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---