धुळ्यात तापमानाचा कहर; उष्णतेमुळे 200 कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री व्यवसायावर संकट…!

---Advertisement---

 

धुळे शहर आणि परिसरात उष्णतेचा प्रचंड कहर सुरू असून, तापमानाने तब्बल 45.1 अंश सेल्सिअसची नोंद घेतली आहे. या उष्णतेच्या लाटेचा फटका आता केवळ नागरिकांनाच नव्हे तर प्राणी आणि पक्ष्यांनाही बसताना दिसत आहे.

धुळे तालुक्यातील आर्णी गावात उष्णतेमुळे मोठी हानी झाली असून, एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील सुमारे 200 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्या बेजार होऊन दगावल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या परिस्थिती अशी आहे की, पंखे आणि कुलरसारखी साधनेही उष्णतेपुढे निष्प्रभ ठरत आहेत. दुपारच्या वेळी सूर्य जणू आग ओकत असल्याने रस्तेही निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे.

या उष्णतेच्या लाटेमुळे पोल्ट्री व्यवसायालाही मोठा फटका बसत असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हवामान तज्ञांच्या मते, तापमानात अशीच वाढ कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत आणखी नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यासह धुळे जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे मानवी जीवनाबरोबरच पशू-पक्ष्यांचेही हाल होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---