कौटुंबिक कारणावरून शालकाचा मेव्हण्यावर गोळीबार, शिरपूर येथील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

---Advertisement---

 

धुळे : कौटुंबिक कारणावरून शिरपूर शहरात शालकाने थेट मेव्हण्यावर गोळी झाडली. यात मेव्हणा जखमी झाला असून याप्रकरणी वधुच्या माम सह आठ जणांविरोधात शिरपूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

भरतसिंग नगर येथील योगेश उर्फ संदीप भगवान पाटील सोमवारी दुपारी मित्र विशाल सोनवणे, प्रवीण कोळी यांच्यासह मारुती मंदिराजवळ जात होते. त्याठिकाणी दबा धरून बसलेले सागर दगडू पाटील, हर्षल उर्फ मोटी मछिंद्र रामोळे, भटू उर्फ भूषण गोपाल पाटील, सुनील उर्फ भावश्या दगा कोळी, विशाल राजेंद्र बाबर, अमोल गोपाल पाटील, गोपाल उर्फ चंद्रा रमेश चौधरी (सर्व रा. भरतसिंग नगर शिरपूर), जयेश सुनील पाटील (रा. मराठा गल्ली, शिरपूर) यांनी संदीप पाटील यांच्या दिशेने बंदुकीतून गोळीबार केला. यात संदीप पाटील यांच्या डाव्या हाताला गोळी लागून ते जखमी झाले, तर विशाल वसंत सोनवणे व प्रेम प्रवीण कोळी हे देखील जखमी झाले. जखमी संदीप पाटील यांच्यावर शिरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Select कर्ज दिलं पण व्याजाचे पैसे परत न केल्याने सावकाराकडून महिलेवर अत्याचार, 200 ते 300 अत्याचाराचे व्हिडिओ; पीडितेच्या दाव्याने खळबळ….!कर्ज दिलं पण व्याजाचे पैसे परत न केल्याने सावकाराकडून महिलेवर अत्याचार, 200 ते 300 अत्याचाराचे व्हिडिओ; पीडितेच्या दाव्याने खळबळ….!

याप्रकरणी संदीप पाटील यांनी शिरपूर शहर पोलिसात फिर्याद दित्यानुसार आठ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सागर याच्यासह अन्य संशयितांना ताब्यात घेतले. तर संशयित जयेश पाटील हा अद्याप फरार आहे. संशयित सागर दगडू पाटील हा योगेश उर्फ संदीप भगवान पाटील यांचा शालक असून सागर याच्या बहिणीचा मृत्यू झाल्यापासून दोघांमध्ये वाद सुरु आहेत. त्यातच संदीप यांच्या मुलीचा विवाह ठरला असून त्यात सख्ख्या मामाचे नाव नसल्याने या रागातून हल्ला झाला का शेतीच्या वाद आहे, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. संदीप पाटील यांच्या मुलीची हळद असल्याने त्यांच्या नातेवाईकासह नवऱ्या मुलाकडील नातेवाईक देखील शिरपूर येथे दाखल झाले होते. मात्र दुपारच्या सुमारास झालेल्या या थरारक घटनेने वर मुलाकडच्या नातेवाईकामध्ये भीती पसरली काही दिवसांपूर्वीच पिंपळनेर शहरात लग्न मंडपात दोन कुटुंबीयांम ध्ये वाद होऊन खुनाची घटना घडली होती. त्या पाठोपाठ शिरपूर शहरात घटना घडली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---