---Advertisement---
जळगाव तालुक्यातील पाथरी येथे गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन फार्मफ्रेश फूड लि. आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नेस्लेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १३५ रुग्णांनी याचा लाभ घेतला.
शिबिरात बीपी, शुगर, ईसीजीसह विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. तसेच रुग्णांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. अमीत भास्कर, डॉ. यज्ञेश चौधरी, हर्षा नन्नवरे, तेजस पाटील, सुनिता सिसोदिया, सागर मसाने तसेच म्हसावद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशांत चौधरी उपस्थित होते.
डॉक्टरांनी रुग्णांना वैद्यकीय सल्ल्याबरोबरच निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाथरी ग्रामपंचायत तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच वैजंताबाई शिरसाठ, प्रदिपसिंग पाटील, संजू प्रकाश लंगरे, समाधान धनगर, पृथ्वीराज पाटील, दिपक जाधव, दिपक चांभार, आशितोष माळी, रविंद्र धनगर आदी उपस्थित होते.
गावातच मोफत आरोग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळाल्याने वेळ आणि खर्चाची बचत झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला.









