---Advertisement---
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) निकालाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि मंडळाचे अध्यक्ष टी. जी. कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत हा निकाल अधिकृतपणे जाहीर केला.
राज्याचा एकूण निकाल: ८९.७९%
मुलींचे वर्चस्व: ९३.१५% (मुली मुलांच्या तुलनेत आघाडीवर)
मुलांचा निकाल: ८६.८०%
अव्वल विभाग: कोकण (९४.१४%)
राज्यात कोकण विभागाने आपला दबदबा कायम ठेवला आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विभागांची टक्केवारी खालीलप्रमाणे:
कोकण: ९४.१४% (प्रथम)
पुणे: ९१.२५%
अमरावती: ९०.९२%
नाशिक: ९०.७२%
मुंबई: ९०.०८%
कोल्हापूर: ८९.९७%
छत्रपती संभाजीनगर: ८८.६८%
नागपूर: ८८.६७%
लातूर: ८४.१४%
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून खालील संकेतस्थळांवर आपला वैयक्तिक निकाल पाहता येईल:
१. mahahsscboard.in
२. hscresult.mahahsscboard.in
३. hscresult.mkcl.org
निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वत्र ‘कुठे पेढे, तर कुठे कौतुक’ असे वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, आता सर्वांचे लक्ष पुढील प्रवेश प्रक्रियेकडे लागले आहे.









