लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक; बालविवाह रोखण्यासाठी मोठा निर्णय….!

---Advertisement---

 

राज्यात बालविवाहाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता लग्नाच्या पत्रिकेवर वधू आणि वराची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने यासंदर्भात आदेश जारी केले असून हा निर्णय बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी पाऊल मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कोणत्याही लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर वधू आणि वर या दोघांचीही जन्मतारीख नमूद करणे आवश्यक राहणार आहे. यामुळे संबंधित मुलगा किंवा मुलगी कायदेशीर वयाची आहे की नाही, याची पडताळणी करणे प्रशासन, पोलीस तसेच सामान्य नागरिकांनाही सोपे होणार आहे.

राज्यात अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देण्याच्या घटना वाढत असल्याने आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. केवळ नियम बनवून बालविवाह थांबत नसल्याने आता अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

याचबरोबर, ज्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली मातृत्वाला सामोऱ्या जात आहेत, अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यासाठी आरोग्य, पोलीस, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करण्यात येणार आहे. हे पथक अशा प्रकरणांचा तपास करून जबाबदारी निश्चित करणार आहे.

या नव्या नियमामुळे बालविवाह रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. इतर काही राज्यांमध्येही अशा प्रकारचे नियम लागू करण्यात आले असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही हा निर्णय राबविण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---