महापौर येती घरा: पाणीपुरवठ्याच्या तक्रारीची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

---Advertisement---

 

शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील रायसोनी नगर परिसरात मागील काही दिवसांपासून अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिल्यानंतर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
बुधवारी (५ मे) महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका सुरेखा तायडे तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घृष्णेश्वर साळुंखे यांनी रायसोनी नगर, माऊली नगर आणि जे. के. विद्यालय परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधत “पाणी नियमित मिळते का? दाब योग्य आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर नागरिकांनी पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच महापौर आणि उपमहापौर प्रत्यक्ष घरी येऊन समस्या जाणून घेत असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.


दरम्यान, काही नागरिकांनी गटारी वेळेवर साफ होत नसल्याची तक्रारही मांडली. यावर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
महापौरांच्या तत्परतेमुळे आणि समस्येचे त्वरित निवारण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ‘महापौर येती घरा’ या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---