कत्तलीचे गोवंश पोलीस छाप्यात मुक्त बाफना गोशाळेत मिळाले जीवदान, तीन महिन्यांच्या वासराला गायीने पाजले दूध

---Advertisement---

 

जळगाव शहरातील मासूमवाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी कत्तलीसाठी बांधून ठेवलेले १३ गो-हे आणि एका लहान वासराची सुटका केली. मुक्त करण्यात आलेल्या या सर्व पशुंना उपचारासाठी आणि संगोपनासाठी अहिंसा तीर्थ, रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र, कुसुंबा येथे सुपूर्द करण्यात आले आहे.

बाफना गोशाळेत मायेची सावली

जप्त केलेल्या पशुंपैकी काही पशु दयनीय अवस्थेत होते. अनेक पशू जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बाफना गोसेवा केंद्रात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. यातील विशेष हृदयस्पर्शी बाब म्हणजे, सुटका केलेल्यांमध्ये अवघ्या ३ महिन्यांच्या एका लहान वासराचा समावेश आहे. या वासराला गोशाळेत आणताच तेथील एका गायीने त्याला आपले दूध पाजले. कत्तलखान्याच्या उंबरठ्यावरून परतलेल्या या निष्पाप जिवाला गोशाळेत नवीन जीवन आणि मायेची ऊब मिळाली आहे.

  • आम्ही सर्व जखमी पशुंची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. विशेषतः त्या लहान वासराची प्रकृती स्थिर असून गोशाळेतील वातावरणात ते आता सुरक्षित आहे.
    सुशीलकुमार बाफना, कार्याध्यक्ष – रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र, जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---