जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ: सोनं 3 हजारांनी महाग, चांदीत 7 हजारांची वाढ, ग्राहकांची चिंता वाढली…!

---Advertisement---

 

जळगाव सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतत घसरत असलेल्या दरांना आज अचानक ब्रेक लागला असून, एका दिवसातच मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

आज सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 1 लाख 50 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह हा दर 1 लाख 55 हजार 221 रुपये इतका झाला आहे.

चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली असून आज चांदी 7 हजार रुपयांनी महागली आहे. सध्या चांदीचे दर 2 लाख 51 हजार रुपयांवर पोहोचले असून जीएसटीसह हा दर 2 लाख 58 हजार 530 रुपये इतका आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 3 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात जवळपास 10 हजार रुपयांची घसरण झाली होती. मात्र आजच्या वाढीमुळे ही घसरण मोठ्या प्रमाणात भरून निघाल्याचे दिसत आहे.

सोने तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या किमतीतील चढ-उतार आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत आहे. मात्र आगामी काळात सोन्या-चांदीचे दर वाढतील की पुन्हा घसरण होईल, याबाबत अद्यापही स्पष्टता नसून बाजारातील अनिश्चितता कायम आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---