Pakistan News: पाकिस्तान थोडक्यात वाचला! भारतानं दाखवली माणुसकी; ‘त्या’ एका अलर्टमुळे लाखो नागरिकांचा जीव वाचला

---Advertisement---

 

​नवी दिल्ली/इस्लामाबाद:
गेल्या काही काळापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणलेले असतानाच, भारतानं दाखवलेल्या माणुसकीमुळे पाकिस्तान एका मोठ्या नैसर्गिक आपत्तीतून थोडक्यात वाचला आहे. सिंधू जल करारावरून जगभरात भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला भारतानंच मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढलं असून एका मोठ्या पुराचा अनर्थ टळला आहे. भारतानं दिलेल्या वेळेवरच्या अलर्टमुळे पाकिस्तानला पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला आणि हजारो-लाखो नागरिकांचा जीव वाचला.


​सलाला धरणाचे दरवाजे उघडण्यापूर्वी भारताचा अलर्ट
​जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर असलेल्या ‘सलाल धरणाचे’ दरवाजे मान्सूनपूर्व गाळ काढण्यासाठी नुकतेच उघडण्यात आले. भारतीय अधिकाऱ्यांनी याची पूर्वकल्पना आणि पुराचा संभाव्य धोका अत्यंत योग्य वेळेत पाकिस्तानी अधिकाऱ्यांना कळवला.
​३० मेपर्यंत पाण्याचा प्रवाह जास्त राहणार: भारतानं सलाल धरणाचे स्पिलवे गेट उघडल्यानंतर, ३० मेपर्यंत चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि जास्त राहणार असल्याची कल्पना पाकिस्तानला आधीच दिली आहे.
​पाकिस्तानात आपत्कालीन अलर्ट: भारताकडून ही माहिती मिळताच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या कृषी विभागाने आणि सियालकोटच्या उपायुक्तांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी हाय अलर्ट जारी केला. त्यामुळे त्यांना मदत आणि बचाव पथके सज्ज ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.


​सिंधू जल करार स्थगित करूनही भारतानं दाखवली माणुसकी

​गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जोडले गेल्याने भारतानं ‘सिंधू जल करार’ स्थगित केला होता. यानंतर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला; “भारत पाण्याचा वापर शस्त्रासारखा करत आहे,” असा खोटा प्रचारही केला. मात्र, या सर्व विरोधानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर दोन्ही देशांतील संबंध टोकाला गेलेले असतानाही, भारतानं पुरासारख्या गंभीर संकटाच्या वेळी शत्रुत्व बाजूला ठेवून माणुसकीचे दर्शन घडवले.


​चिनाब ही सिंधू खोऱ्यातील प्रमुख ६ नद्यांपैकी (सतलज, बियास, रावी, सिंधू, झेलम आणि चिनाब) एक आहे. सिंधू खोऱ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास त्याचा थेट फटका पाकिस्तानच्या खालील भागाला म्हणजेच पंजाब प्रांताला बसतो. जर भारतानं सलाल धरणाचे दरवाजे उघडल्याची माहिती लपवली असती, तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण पूर येऊन मोठा अनर्थ घडला असता.
​पाकिस्तानच्या सततच्या भारताविरोधी कारवायांना भारतानं एका जबाबदार देशाप्रमाणे ‘अलर्ट’ देऊन चोख आणि मानवतावादी उत्तर दिले आहे, अशीच चर्चा आता रंगत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---