---Advertisement---
दूरचित्रवाणी आणि रेडिओ प्रसारण सेवांसाठी एकच समान नियामक चौकट तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. या अंतर्गत खासगी रेडिओ सेवांनाही राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे विषय प्रसारित करणे बंधनकारक केले जाणार आहे. हा नवा मसुदा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी टेलिकम्युनिकेशन्स (टेलिव्हिजन, रेडिओ आणि संबंधित सेवा) नियम, २०२६ प्रसिद्ध केला. त्यात हे बदल समाविष्ट आहेत.
आतापर्यंत टीव्ही चॅनेल्सना सार्वजनिक सेवा प्रसारण अधिक कडक करून आधी “करू शकतात” असा पर्याय होता. पण नव्या मसुद्यात तो बदलून “करणे आवश्यक आहे” असा करण्यात आला आहे. ही जबाबदारी आता टीव्हीवर अधिक बंधनकारक होणार आहे.हे कार्यक्रम शिक्षण, आरोग्य, शेती, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला कल्याण, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या विषयांवर आधारित असतील.
आता टीव्ही चॅनेल्सना दर दिवशी किमान ३० मिनिटे राष्ट्रीय आणि सामाजिक घटकांशी निगडित महत्त्वाचे कार्यक्रम प्रसारित करणे सक्तीचे करण्यात आले आहे. टीव्ही चॅनेल्सना हे कार्यक्रम सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत प्रसारित करावे लागतील. खासगी रेडिओ स्टेशनना दररोज किमान १ तास राष्ट्रीय आणि सामाजिक घटकांशी निगडित महत्त्वाचे कार्यक्रम प्रसारित करावे लागतील.
देशातील खासगी एफएम रेडिओ स्टेशन्सना बातम्या प्रसारित करण्याची परवानगी देण्याची दीर्घकाळाची मागणी या मसुद्यातही मान्य करण्यात आलेली नाही. त्याऐवजी रेडिओ स्टेशनना फक्त 3 आकाशवाणीचे बदल न केलेले न्यूज बुलेटिन प्रसारित करण्याचीच परवानगी राहणार आहे.









