---Advertisement---
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी झाला असून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. या घडामोडीनंतर जागतिक बाजारपेठेसह भारताने सुटकेचा श्वास घेतला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्याने मध्यपूर्वेत सुरु झालेल्या संघर्षाचे मोठे परिमाम भारतावर झाले असून, होर्मुज सामुद्रधुनीतील तणाव कमी झाल्याने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी होऊ शकतात.
भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 80 ते 85 टक्के कच्चे तेल आयात करतो. अमेरिकेन इराणवरील निर्बंध कमी केल्यामुळे भारत आता इराण कडून तेल निर्यात करु शकतो. त्यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्यास भारतात महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे इराण आणि भारत यांच्यातील व्यापार डॉलर मध्ये न करता भारतीय रुपयात केला जातो यामुळे भारताला याचा खूप मोठा फायदा होणार आहे . आयात खर्च कमी होण्यास आणि परकीय चलनावरील दबाव घटण्यास मदत होऊ शकते. घसरत असलेला रुपया सावरायला ही मदत होईल.
भारत आणि इराणमधील व्यापारात रुपयांचा वापर होण्याची शक्यता असल्याने व्यवहार अधिक सुलभ होऊ शकतात. तसेच भारताने गुंतवणूक केलेल्या चाबहार बंदराच्या विकासालाही गती मिळू शकते. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून मध्य आशियाई देशांशी व्यापार वाढवण्याचा मार्ग उपलब्ध होतो.









