---Advertisement---

Rohit Pawar : उपमुख्यमंत्री पवारांच्या भेटीला, अर्ध्या तासापासून चर्चा सुरू; चर्चांना उधाण

---Advertisement---

मुंबई : आमदार रोहित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. विधीमंडळातील अजित पवार यांच्या दालनात मागील अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या भेटीमागे मतदारसंघातील वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अर्ध्या तासांपुर्वी रोहित पवार अजित पवारांना भेटण्यासाठी गेले आहेत.

गेल्या अर्ध्या तासांपासुन या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. कर्जत -जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा रोहित पवार यांनी सभागृहात मांडला होता. तर यासंदर्भात त्यांनी विधानभवनाच्या आवारात पावसात एकट्याने आंदोलनही केलं होतं. तर या कारणासाठी रोहित पवार यांनी अजित पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment