आधारपेक्षाही आता जन्माचा दाखला महत्त्वाचा; नवीन कायदा कधीपासून होणार लागू?

---Advertisement---

 

नवी दिल्ली: वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नोंदणी, पासपोर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे. १ ऑक्टोबरपासून अनेक ठिकाणी याचा वापर अत्यावश्यक कागदपत्र म्हणून होणार आहे.

जन्म आणि मृत्यू नोंदणी संशोधन विधेयकाला राष्ट्रपतींनीदेखील मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार आहे. नव्या कायद्यामुळे नागरिकांच्या नोंदणीकृत जन्मतारखेची राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार आहे. विविध प्रकारच्या सार्वजनिक सेवा चांगल्या पद्धतीने पुरविता येतील. आधार कार्डप्रमाणेच जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्राचा वापर होईल.

डिजिटल जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे मिळणार
नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपातही मिळतील. सध्या त्यांची छापील प्रत मिळते. तसेच त्यासाठी बराच वेळही लागतो. डिजिटल प्रक्रियेमुळे काम लवकर होईल.

या कामांसाठी करता येईल वापर
शाळेत प्रवेश, मतदार नोंदणी, वाहनचालक परवाना, विवाह नोंदणी, पासपोर्ट बनविणे, सरकारी नोकरी, आधार नोंदणी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---