70 रुपयांचा शेअर, मोठ्या नफ्याची संधी? ‘हंगर नट्स’च्या मूळ कंपनीचा IPO 29 जूनपासून खुला….!

---Advertisement---

 

गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ड्रायफ्रूट्स क्षेत्रातील लोकप्रिय ‘हंगर नट्स’ ब्रँडची मूळ कंपनी ॲडॉन ॲग्रो कमोडिटीज लिमिटेड आपला बहुप्रतीक्षित IPO 29 जून 2026 पासून खुला करत आहे. कंपनी या सार्वजनिक समभाग विक्रीद्वारे सुमारे 44.03 कोटी रुपये उभारणार असून हा इश्यू BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहे.

IPO 29 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. कंपनीने प्रति शेअर 66 ते 70 रुपये असा प्राइस बँड निश्चित केला आहे. किमान अर्जासाठी 2,000 शेअर्सचा एक लॉट घ्यावा लागणार असून त्यासाठी सुमारे 1.40 लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असेल.

कंपनीने सांगितले आहे की, IPO मधून मिळणारा निधी प्रामुख्याने वर्किंग कॅपिटल, व्यवसाय विस्तार आणि इतर कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्यात येणार आहे.

आर्थिक कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, कंपनीने गेल्या काही वर्षांत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा महसूल 22.33 कोटी रुपये होता, तो आर्थिक वर्ष 2025 मध्ये वाढून 103.03 कोटी रुपये झाला. तर 31 जानेवारी 2026 पर्यंतच्या केवळ दहा महिन्यांत कंपनीने 287.16 कोटी रुपयांचा महसूल आणि 21.55 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे.

मुंबईस्थित ॲडॉन ॲग्रो कमोडिटीज लिमिटेड ही कंपनी बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता, बेदाणे, खजूर आणि इतर प्रीमियम ड्रायफ्रूट्सचे आयात, प्रोसेसिंग आणि वितरण करते. कंपनीची उत्पादने ‘Hunger Nuts’ या ब्रँडअंतर्गत देशभरातील रिटेल स्टोअर्स, APMC बाजारपेठा, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात.

कंपनी UAE, अफगाणिस्तान, अमेरिका, चिली आणि श्रीलंका यांसारख्या देशांतून थेट ड्रायफ्रूट्स आयात करते. नवी मुंबईतील महापे MIDC येथे अत्याधुनिक प्रोसेसिंग युनिट असून दुबईमध्येही कंपनीची उपकंपनी कार्यरत आहे.

भारतातील ड्रायफ्रूट्स उद्योग सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा IPO बाजारात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, हा SME IPO असल्यामुळे त्यातील जोखीम, कंपनीची आर्थिक स्थिती आणि अधिकृत प्रॉस्पेक्टसचा अभ्यास करूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणे योग्य ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---