---Advertisement---

मोदींच्या गीतांना जळगावच्या संजय हांडेंनी चढविला संगीताचा साज

by team
---Advertisement---

जळगाव : एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ते उत्कृष्ट पंतप्रधान आणि राजकीय व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांचा जागतिक स्थरावर परिचय आहे. परंतु एक उत्कृष्ट कवी म्हणून फारच थोड्या जणांना माहीत आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या कवितेच्या सीडीचे रविवार, १७ सप्टेंबरला दिल्ली येथे प्रकाशन होत आहे. या गीताला जळगाव आकाशवाणी केंद्राचे संगीतकार संजय हांडे यांनी संगीत दिलेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम’ हे गीत गुजराती भाषेत लिहिले आहे. त्याचा डॉ. रंजना संधीर यांनी हिंदीत अनुवाद केलेला आहे.

या गीताला जळगाव आकाशवाणी केंद्राचे संगीतकार संजय हांडे यांनी सांगितली आहे.आकाशवाणी दिल्ली केंद्रांची निर्मितीआयोजक आहेत. सीडीचे प्रकाशन राष्ट्रीय असून, हैदराबादच्या सांबाशिव राव यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजता नवी दिल्लीच्या आकाशवाणीतील रंगभवनात सीडीचे प्रकाशन होणार आहे.यासाठी शिवा फौंडेशन, राष्ट्रीय मुस्लीम मंच, आकाशवाणी दिल्ली यांचे सहकार्य मिळाले आहे. मदरलैंड इंटरनॅशनल फौंडेशन कार्यक्रमाचे स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे, तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. इमरान चौधरी, मदरलैंड इंटरनॅशनल फौडेशनचे महामंत्री डॉ. श्रीराम जोशी, आकाशवाणी दिल्ली केंद्राचे मनोहरसिंग रावत उपस्थित राहणार आहेत.

जळगावच्या संजय हांडेचे संगीत 

जळगाव आकाशवाणी केंद्राचे संगीतकार संजय हांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वंदे मातरम अपनी शान’ या गीताला संगीत दिले आहे. यापूर्वीही त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना संगीत साज दिलेला आहे.प्रकाशन होत आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment