---Advertisement---

Jalgaon News : दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक, दोन ठार

by team

---Advertisement---

सोयगाव:  दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले असून, दोन गंभीर झाल्याची घटना वरठाण तिडका रस्त्यावर सोमवार, दि. १५ रोजी सायंकाळी पाचच्या सुम ारास घडली. सुनील विक्रम बागुल आणि काशिनाथ विठ्ठल पाटील अशी मयतांची नावे आहेत. पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथील काशिनाथ पाटील व राहुल पाटील हे दोघे प्लेटीना गाडीवर पिंप्री येथून किन्ही येथे जात होते.

तर सोयगाव तालुक्यातील वाडीसुतांडा येथील सुनील बागुल व सतीश मोरे हे दोघे डिस्कर गाडीवर वाडी येथून तिडकाकडे जात होते. तेव्हा वरठाण तिडका रस्त्यावर दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुनील विक्रम बागुल व काशीनाथ विठ्ठल पाटील हे जागीच ठार झाले. राहुल त्र्यंबक पाटील सतीश सखाराम मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळी उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार संदीप सुसर, विकास दुबेले, श्रीकांत तळेगावकर जावून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना पाचोरा येथील दवाखान्यात पाठविले. अपघाताच्या ठिकाणी मोठा जमाव दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकी अपघात होऊन दोन ठार झाल्याची वार्ता परिसरात पोहचताच घटनास्थळी मोठा जमाव झाला होता. या अपघातातील मयत पिंप्री येथील काशिनाथ पाटील याचा एक वर्षापूर्वी विवाह झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---