---Advertisement---

हृदयद्रावक! पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

---Advertisement---

भडगाव : पोलिस बनण्याचे स्वप्न पाहात व्यायामासाठी निघालेल्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे ५.४५ वाजता कजगाव येथे घडली. रोहित अशोक मराठे (वय १९) असे या तरुणाचे नाव आहे. तो भडगाव येथील न्यू इंग्लिश शाळेत १२ वीत शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बारावीनंतर पोलिस बनायचे स्वप्न उराशी बाळगत रोहितने रोज मित्रांबरोबर व्यायाम सुरू केला होता. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तो मित्रांसोबत व्यायामासाठी निघाला कजगावनजीकच्या पेट्रोलपंपासमोरच चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला उडवले.

तो खाली कोसळताच या भागातच फिरण्यासाठी आलेले दादाभाऊ पाटील, वैभव बोरसे, प्रमोद पवार, अशोक पाटील, रवी मालचे यांनी तात्काळ रुग्णवाहिका मागवली आणि रोहितला उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

रोहित हा हुशार होता. त्याचा भाऊ इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. एक बहीण विवाहित आहे. आई-वडील शेती करतात. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment