---Advertisement---

10वी पास उमेदवारांसाठी खुशखबर! जळगाव जिल्हा होमगार्ड भरती जाहीर

---Advertisement---
जळगाव जिल्हा होमगार्ड भरती निघाली आहे. यासाठीचे नोटिफिकेशन संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. दहावी पास उमेदवारांना ही मोठी संधी असणार आहे. पात्र उमेदवारांनी वेळ अजिबात वाय न घालवता ताबडतोब अर्ज करावा. या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पदासाठी अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच 25 जुलै पासून सुरु होईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसाठी पात्रता काय? या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा. वयाची अट : 20 ते 50 वर्षे असावे. (दि. 31/07/1974 नंतर ते दि. 31/07/2004 पुर्वी) भरतीसाठी शारिरीक पात्राता : उंची – पुरुष उमेदवारासाठी उंची 162 से.मी. व महिला उमेदवारासाठी 150 से.मी. छाती – (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमा. 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक) होमगार्डना देय भत्ते : होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता व रु. 100/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. 35/- खिसाभत्ता व रु. 100/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. 90/- कवायत भत्ता दिला जातो. जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment