---Advertisement---
जळगाव : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर माघारी घेतली जात आहे. यात काही अपक्ष उमेदवार आपला अर्ज माघार घेत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज माघारिकरिता सोमवार, ४ तारीख निश्चित केली आहे. अर्ज माघारीनंतर मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. काही मतदार संघांत राजकीय पक्षांकडून बंडखोर तसेच अपक्ष उमेदवारांची माघारींकरिता मनधरणी केली जात आहे. चार तारखेच्या माघारीनंतर नंतर त्यातच प्रचाराकरिता केवळ १४ दिवस मिळणार आहेत.
एकीकडी चार दिवस दिवाळीची धामधूम पाहायला मिळत असताना ४ तारखेच्या माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. माघारीच्या चार नोव्हेंबरनंतर उमेदवारांकडून प्रचाराचे नियोजन करण्यात येत आहे. यात काही उमेदवारांनी प्रचाराचे वाढवून प्रचाराला प्रारंभ केला आहे. प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संपत असून मतदान २० नोव्हेंबाला होणार आहे. उमेदवारांना प्रचारकरिता केवळ १४ दिवस मिळत आहेत. या १४ दिवसाच्या काळात केवळ दोनच रविवार येत असल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.
प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळत असल्याने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराचा कस लागणार आहे. उमेद्वारांसोबतच नेत्यांची रॅली, जाहीर सभांचे आयोजनाबाबत नियोजन करण्यात . महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होत असल्याने राजकीय पक्षांच्या स्टार प्रचरकांना मोठी धावपळ करावी लागणार आहे. नेत्यांच्या जाहीर सभेबाबत वेळापत्रक तयार करण्यात पक्ष मग्न आहे.
सोशल मीडियाचा आधार
उमेदवार आपला प्रचार पारंपरिक पद्धतीसोबतच आधुनिकतेची कास धरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोशल मीडियावर उमेदवार सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. आचारसंहिता लागू असल्याने उमेदवारांना सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अटी, शर्तीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खन्या अर्थाने ७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे प्रचारासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहेत. या कालावधीत दोनच रविवार मिळणार आहेत, त्यामुळे मतदारापर्यंतः पोहोचण्यासाठी उमेदवाराना मोठी कसरत
---Advertisement---