---Advertisement---

Jalgaon Crime News : विश्वास संपादित करत तोतया पोलिसांनी लांबवीले अडीच लाखांचे दागिने

by team
---Advertisement---

जळगाव :   दुचाकीवरून बाहेरगावी जाणा-या दोघांना पोलीस असल्याची बतावणी करून महिलेजवळील २ लाख ६५ हजार किमतींचे सोन्याचे दागिने पळविल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. हा प्रकार भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्पाजवळील बसस्थानकाजवळ घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील आदर्श गल्ली येथे वसंत जगन्नाथ पाटील (वय-१९)  हे आपल्या कुटुंबासह  वास्तव्याला आहेत. गुरुवार, ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता वसंत पाटील हे महिलेसह दुचाकीने दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्राजवळील बसस्थानकाजवळून जात होते.

यावेळी अज्ञात दोघांनी त्यांचा रस्ता अडवत आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला सिटी मारली, तुम्ही थांबले का नाहीत? आताच या रस्त्याने म्हातारीला लुटलेले आहे, तुम्ही काय एवढे सोने घालून फिरत आहेत. ते काढा, असे सांगून वसंत पाटील व महिलेचा विश्वास संपादन करून त्यांनी सोने व कागदपत्रे रूमालात बांधण्याचे सांगितले.

या तोतया पोलिसांच्या बतावणीला बळी पडून महिलेने अंगावरील सोने काढून रूमालात ठेवले. तुमचे सोने डिक्कीत ठेवून देतो असे सांगत हातचालाखी करून तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविण्याची धक्कादायक घटना घडली. सोने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वसंत पाटील यांनी तातडीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काडेकर आहे.

 

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment