---Advertisement---

Dhule Crime News: वाद विकोपाला गेला अन् चढविला कुऱ्हाडीने हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल

by team

---Advertisement---

धुळे : जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घराच्या जागेच्या वादावरुन एकास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत चौघांनी कुऱ्हाडीने हल्ला चढवत त्या व्यक्तीला गंभीररीत्या जखमी केले. निजामपूर पोलीस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी व्यक्तीचे नाव नंदू वसंत मोरे (34 ,रा. आयने, ता.साक्री) आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नंदू मोरे हे रात्री ९ वाजेच्या सुमारास घरी होते. यावेळी विजय वामन सोनवणे, लताबाई विजय सोनवणे, योगेश विजय सोनवणे, निकुबाई विजय सोनवणे (सर्व रा.आयने,ता.साक्री) या चौघांनी घराच्या जागेवरून भांडण उकरून काढले. योगेश सोनवणे याने दमदाटी करत घर बांधण्यास विरोध दर्शवित ही जागा मी विकत घेतली आहे असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादाचे परिवर्सन हाणामारीत झाले. चौघांनी नंदू मोरे यांना बेदम मारहाण करत शिविगाळ केली. यावेळी योगेश सोनवणे याने कुऱ्हाडीने नंदू मोरे यांच्या डोक्यात वार केले. यात आघाताने मोरे हे खाली कोसळले. मोरे यांच्या याबाबत निजामपूर पोलीस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मयुर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल मोरे पुढील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---