---Advertisement---

Jalgaon News : रस्त्यांच्या कामावरून लोकप्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, आ. भोळेंनी काढली चक्क लाज

---Advertisement---

Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्यांच्या कामावरुन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच जुंपली. यावेळी आमदार सुरेश भोळे यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला. या आढावा बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच चांगलेच धारेवर धरत चक्क त्यांची लाज काढली. दरम्यान, आ. भोळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, जळगावात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रलंबित असून कामांच्या दर्जाही निकृष्ठ आहे. प्रलंबित कामे व त्यांच्या दर्जाबाबत आ. सुरेश भोळे यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी आ. भोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ऐवढेच नाही तर निधीचा विषय पुढे करून अधिकाऱ्यांकडून सरकारची बदनामी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आमदार भोळेंनी काढली अधिकाऱ्यांची लाज

जिल्हा नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये चांगलिच जुंपल्याचे बघायला मिळाले. शहरातील रस्त्यांच्या कामाबाबत हा संताप दिसून आला. यावेळी आ. भोळे यांनी रस्त्यांच्या कामांच्या दर्जेविषयी अधिकाऱ्यांना जाब विचारत, लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात अधिकाऱ्यांना लाज वाटते का? असा सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच शहरातील रस्त्यांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा, असे देखील खडसावले.

पालकमंत्र्यांनीही दिल्या सुचना

नागरीसुविधाबाबत आ. भोळे यांची मागणी आणि सध्यास्थितीत रस्त्यांच्या कामाची स्थिती लक्षात घेत पालमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हे जनतेचे सेवक असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कर्तव्य पार पाडले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकाने समन्वय साधून लोकांच्या प्रश्न तातडीने मार्गी लावले पाहीजे, असेही ते म्हणाले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment