---Advertisement---

Raver Crime : रावेर येथे गोवंश मांस विक्री करणाऱ्यावर छापा, दाम्पत्यास अटक रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई

---Advertisement---

Raver Crime : शहरातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश मांस विक्री होत असत्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गोवंश मांस विक्री करणाऱ्यावर छापा टाकून घटनास्थळावरून दाम्पत्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीचे २०० किलो गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे जप्त केली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सकाळी रावेर शहरात कुरेशी मोहल्ला भागात गोवंशाची कत्तल करून गोमांस विक्री सुरू आहे, अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस पथक तातडीने शहरातील कुरेशी मोहल्ल्याकडे गेले.

गुन्हे शोध पथकाने शहरातील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला असता नजमाबी मोहम्मद हुसेन भतीयारा (वय ३७) व तिचा पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा (वय ५५) हे दोघे गोवंश मांस विक्री करण्याच्या उद्देशाने गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून त्यांचे दुमजली घराच्या बाजूला लोखंडी शटर असलेल्या दुकानामध्ये हातात कुन्हाड व सुन्ऱ्याने मोस कापताना दिसून आले. पोलिसांनी या दाम्पत्यास ताब्यात घेतले.

मात्र त्यांना मदत करणारा एक इसम हा गल्लीबोळाचा फायदा घेत फरार झाला. या कारवाईत ४० हजार रुपये किमतीचे अंदाजे २०० किलो वजनाचे गोमांस, ३०० रुपये किमतीची एक कुन्हाड, ४०० रुपये किमतीचे सुरे जप्त करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या समक्ष मांसाचे नमुने घेण्यात आले आहेत. याबाबत पो. कॉ. सचिन घुगे यांनी फिर्याद दिल्याने रावेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियमाअंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यांनी कारवाई केली

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, साहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, महेश मोगरे, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, सचिन घुगे या पथकाने केली. तपास कल्पेश आमोदकर करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment