---Advertisement---

Crime News : शहाद्यातील दाम्पत्यासह नाशिकच्या १० जणांची तीन कोटींत फसवणूक, पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

Crime News : नाशिक येथील ग्रेप काऊंटी रिसॉर्ट व ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या नावाने व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून शहाद्यातील दाम्पत्यासह नाशिकच्या दहा जणांची तीन कोटी रुपयांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिकच्या एकाविरुद्ध शहादा येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपेंद्र साबळे पाटील (रा. खुटवडनगर, नाशिक) याने नाशिक येथे ग्रेप काऊंटी रिसॉर्ट व ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट या नावाने कंपनी स्थापन करून गुंतवणुकीचा व्यवसाय सुरू केला. नोव्हेंबर २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान भूपेंद्र पाटील याने साक्षी जगदीश मानकर (वय २५, रा. मदनमोहन नगर, साईबाबा मंदिराजवळ, शहादा) व त्यांचे पती यांच्याकडून ग्रेप काऊंटी रिसॉर्ट व ग्रो मोअर इनव्हेस्टमेंट कंपनीत आठ लाख रुपये व त्यांचे जवळचे नातेवाईक डॉ. दिनेश रामचंद्र महाजन, रामचंद्र गणपत महाजन, जिजाबाई रामचंद्र महाजन, नम्रता दिनेश महाजन, प्रतिभा राजेंद्र पाटील, कल्पना सोपान सोनवणे, रवींद्र नामदेव घरटे, कमल रवींद्र घरटे, ऊर्मिला तुकाराम कणे, रोहन सोनार (सर्व रा. नाशिक) यांच्याकडून सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक रक्कम घेतती.

ही रक्कम शेअर बाजारात गुंतवून अधिकचा परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. मात्र, संबंधित लोकांना अधिकचा परतावा तर मिळाला नाहीः परंतु त्यांना गुंतवणूक केलेले पैसेदेखील परत मि ळाले नाहीत. म्हणून त्यांची फसवणूक झाली आहे. याबाबत ज्योती मानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रेप काऊंटी रिसॉर्ट व ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी या नावाने व्यवसाय करणारा भूपेंद्र साबळे पाटील याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तपास करीत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment