---Advertisement---

दुर्दैवी ! घराकडे निघालेल्या निवृत्त शिक्षकावर काळाचा घाला, कोसळलेल्या वृक्षाने घेतला बळी

---Advertisement---

जळगाव : कोसळलेल्या वृक्षाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एका निवृत्त शिक्षकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना धानोरा -चोपडा महामार्गावर घडली. सुरेश पीतांबर महाजन (६२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

चोपडा तालुक्यातील धानोरा परिसरात ६ मे रोजी झाल्येल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक वृक्ष कोसळले. अंकलेश्वर-ब-हाणपूर महामार्गावर धानोराहून चिंचोलीकडे जाताना गावाजवळच भला मोठा वृक्ष कोसळला आहे. हा वृक्ष अनेक वाहनांना त्याचा अडथळा ठरतो आहे. मात्र, तरीही सा. बां. विभागाने दुर्लक्ष केले आहे. अखेर याठिकाणी दुचाकीला अपघात होऊन निवृत्त शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

---Advertisement---

गेल्या २० दिवसांपासून हा वृक्ष तसाच पडून आहे. याच वृक्षामुळे शनिवारी रात्री १० वाजता चिंचोलीकडून घरी धानोऱ्याकडे येणारे मूळ धानोऱ्याचे रहिवासी व बिडगाव विद्यालयाचे निवृत्त शिक्षक एस. पी. महाजन यांची दुचाकी या वृक्षावर धडकली व अपघात झाला. त्यात त्यांच्या मेंदूला जोरदार मार लागला. त्यांना तत्काळ धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तेथून मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मयत शिक्षक महाजन हे खो-खोचे राज्यस्तरीय पंच, तसेच धानोरा विविध कार्यकारी सोसायटीचे संचालकही होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, असा परिवार आहे.

देवळीत दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

मेहुणबारे, ता. चाळीसगाव : नजीकच्या देवळीत बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा ३ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी जळगाव तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळी येथील दीपक नामदेव पाटील हे १६ मे रोजी सकाळी १० वाजता कुटुंबासह बाहेरगावी लग्नाला गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. १८ रोजी रात्री ११.३० वाजता ते घरी परतले. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी शोकेसचे लॉकर तोडले व त्यातील ३३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे ३ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

प्रवीण सुभाष पाटील (३२, बिलवाडी, ता. जि. जळगाव) याने ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---