---Advertisement---

Pachora News : घरासमोर बसून करायचे टिंगल, खडवल्याच्या रागातून वृद्धेला संपवून झाले होते पसार, अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात

---Advertisement---

Pachora News पाचोरा : तालुक्यातील शेवाळे येथे जनाबाई माहरु पाटील ( वय ८५ ) या वृद्ध महिलेचा खून करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शुक्रवार (५ जून) रोजी रात्री घडली होती. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासचक्र फिरवित अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे.

पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे मयत महिला जनाबाई माहरु पाटील ( वय ८५ ) या वास्तव्याला होत्या. तर शेजारी त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हा राहत होता. दरम्यान, शुक्रवार (५ जून) रोजी कृष्णराव हा पाचोरा येथे मित्राच्या मुलाच्या वाढदिवानिमित्त गेला होता. वृद्ध महिला घरी एकटी असल्याचे हेरत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून केला. त्यानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या ओरबाडून नेत पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल होत याप्रकरणी तपास सुरु केला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासचक्र फिरवित अवघ्या ४८ तासांत जेरबंद केले आहे.

साहिल मुकद्दर तडवी (वय २१), राकेश बळीराम हातागडे (वय २१), आणि राजेश अनिल हातागडे (वय १८) (सर्व रा. शेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक आरोपींचे नावे असून हे आरोपी गावातीलच असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत सांगितले, मयत जनाबाई यांच्या घराच्या ओट्यासमोर नेहमी बसायचो आणि टिंगल टवाळी करायचो. यावरुन जनाबाई यांनी आम्हाला खडसावले होते. याच रागातून जनाबाई यांच्या घरात चोरी करायची आणि त्यांचा “काटा काढायचा” असा कट रचला. ठरलेल्या कटाप्रमाणे, ५ जून २०२५ रोजी रात्री जनाबाई यांच्या घराच्या मागच्या दाराने आत प्रवेश केला. त्यानंतर, जनाबाई यांना धारदार हत्याराने मारहाण करून त्यांचा खून केला आणि त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओरबडून घेऊन अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला, अशी कबुली तिन्ही आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment