---Advertisement---

Crime News : धक्कादायक ! ३६ वर्षीय विवाहित प्रेयसीला OYO बोलविले अन् सपासप १७ वार करुन…

---Advertisement---

लिव्ह इन रिलेशशीप, प्रेम प्रकरणांमध्ये पार्टनर कडून हत्येचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये घडला आहे. यात प्रियकराने प्रेयसीचा हॉटेलमध्ये नेऊन चाकूने वार करुन खून केल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे हरिनी (३६) तर आरोपी प्रियकराचे नाव यश (२५) आहे.

बेंगळुरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर यश व हरिनी यांच्यात प्रेमसंबंध होते. मृत हरिनीचे लग्न झालेले होते. तिला दोन मुले आहेत. मृत हरिनीचे यशसोबत अवैध संबंध होते असे बोलले जात आहे. हरिनी आणि यश यांची भेट एका जत्रेत झाली होती. या भेटीदरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली. नंतर या ओळखीचे रूपांतर मैत्री झाले. त्यांनी एकमेकांचा फोन नंबर घेतला. दोघे फोनवर बोलू लागले.

या काळात दोघांची जवळीक वाढली. ते एकत्रीत फिरू लागले. हरिनी आणि यशमध्ये अनैतिक संबंध देखील होते. दोघांचे सतत बोलणे होत असे. यामुळे तिच्या पतीला तिच्यावर संशय येऊ लागला. यामुळे त्याने हरिनीकडून तिचा फोन हिसकावून घेतला. यावेळी त्याला त्याच्या पत्नीच्या अवैध संबंधांची माहिती मिळाली. त्यानंतर तिच्या पतीने हरिनीला घरात कोंडून ठेवले.


दरम्यान, तिच्या प्रियकर असलेला यशशी तिचा संपर्क तुटला होता. यामुळे तो बेचैन झाला. यातच त्याने तिचा शोध घेण्याचे ठरविले. त्याने हरिनीला ठार करण्यासाठी चाकू देखील खरेदी केला होता. काही महिन्यानंतर हरिनीने पुन्हा तिचा प्रियकर यशसशी ६ जून रोजी संपर्क केला. यात त्या दोघांनी प्रज्ञा लेआउटमधील ओयो हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरविले. यानुसार ते हॉटेलमध्ये भेटले. यावेळी त्यांनी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर यशने हरिनीला १७ वेळा चाकूने वार करून ठार केले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment