---Advertisement---
जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी आमदार सुरेश भोळे यांनी बैठक घेत प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच औद्योगिक वसाहतीत चार सबस्टेशन उभारण्यात येणार असून, दोन जागा शासनाने निश्चित केल्या असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली, तर उर्वरीत दोन जागा महापालिका देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील औद्योगिक विकास महामंडळासंदर्भातील उद्योजकांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांविषयी महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात बैठक झाली. बैठकीत उद्योजकांना वारंवार उद्भवणाऱ्या महावितरण, समस्या महापालिका एमआयडीसी संबंधित अतिरिक्त ट्रान्स्फॉर्मर, विजेच्या समस्या सोडविण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र उभारणी, कचरा संकलन नियमित व रोटेशनने करण्यात यावा, औद्योगिक वसाहतीतील नवीन रस्त्यांचे प्रस्ताव, रस्ते दुरुस्ती, बंद असलेले पथदिवे दुरुस्ती, नवीन प्रकाशव्यवस्था, दूषित पाणीपुरवठा या विषयांवर चर्चा करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता मुलाणी, विनोद पाटील, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी घाटे, महापालिका अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी, अयोग्यधिकारी उदय पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे चेतन पाटील, डोंगरे, जिल्हा प्रदूषण मंडळाचे राजपूत, महापालिकेचे शहर अभियंता आर. टी. पाटील व लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संतोष इंगळे, समीर साने, रवींद्र फालक, महेंद्र रायसोनी, किशोर ढाके, दीपक चौधरी व औद्योगिक वसाहतीतील सर्व प्रमुख उद्योजक उपस्थित होते.
---Advertisement---

---Advertisement---