---Advertisement---

विमान अपघातात जीव गमावलेल्या परिचारिकेबद्दल वादग्रस्त पोस्ट, अखेर अधिकारी निलंबित

---Advertisement---

केरळ : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात केरळ येथील रंजिता नावाच्या एका परिचारिकेचाही समावेश आहे. रंजिता दोन मुलांची आई असून, ती लंडनमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. काही दिवसांपूर्वी ती गावी आल्यानंतर लंडनला परतत होती, मात्र तिचा हा प्रवास अखेरचा ठरला. दरम्यान, रंजिता हिच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंडू तालुका कार्यालयात कार्यरत असलेले कनिष्ठ अधीक्षक ए पवित्रन यांना रंजीताच्या मृत्यूबद्दल फेसबुकवर केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

पवित्रन यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये रंजीताची खिल्ली उडवणारी टिप्पणी केली होती, ज्याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली. केरळचे महसूल मंत्री के. राजन यांनी पवित्रन यांच्या टिप्पणीला “अपमानजनक आणि अमानवी” म्हटले आणि त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. मंत्र्यांनी सांगितले की, अशा असंवेदनशील टिप्पण्यांमुळे शोकग्रस्त कुटुंबाचे मनोधैर्य खचेल, अशा कृत्याला स्थान नाही.

परिचारिकेच्या मृत्यूने केरळमध्ये शोककळा

रणजिताच्या मृत्यूची बातमी केरळमध्ये पोहोचताच, आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज स्वतः तिच्या मूळ गावी, पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पुल्लाड गावी पोहोचल्या. त्यांनी रंजीताच्या कुटुंबाची भेट घेतली आणि तिच्या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment