---Advertisement---
WTC 2025-27 : दक्षिण आफ्रिकेने २०२३-२५ या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) WTC २०२५-२७ चे वेळापत्रक जाहीर केले आहे.
वेळापत्रकानुसार, ऑस्ट्रेलिया जास्तीत जास्त २२ सामने खेळेल, तर इंग्लंडला २१ सामने खेळावे लागतील. या वर्षाच्या अखेरीस अॅशेस मालिकेदरम्यान दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील. तर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया २०२५-२७ च्या वर्ल्ड कप दरम्यान एकूण १८ कसोटी सामने खेळणार आहे. २० जूनपासून इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेने त्याची सुरुवात होणार आहे.
त्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळेल. याशिवाय, टीम इंडिया कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
---Advertisement---
