जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात शहरातील एका कॉलेज जवळ कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुंटणखान्यावर शनी पेठ पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असून या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका, दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेज जवळ बेकायदेशीर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार, गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर दोन गिऱ्हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये वाढ
जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
जळगावात अत्यवस्थ वृद्धाचा मृत्यू
जळगाव : अचानक प्रकृती अत्यवस्थ झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी (७ मे) दुपारी अडीच वाजेच्या सुम ारास मृत्यू झाला. प्रशांत महादेव पोतदार (वय ७०, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, जळगाव) असे मृताचे नाव आहे. अचानक प्रशांत पोतदार यांची प्रकृती बुधवारी गंभीर झाली हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांसह नातेवाइकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले असता तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक हेमंत कळसकर तपास करीत आहेत.