---Advertisement---
धुळे शहरापासून जवळ असलेल्या नगाव परिसरात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अचानक एका सिमेंट टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीमध्ये टँकर पूर्णतः जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही काही काळ ठप्प झाली होती. आगीच्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरून सिमेंट वाहतूक करण्यात येणारा सिमेंट टँकर हा जात असताना त्याला नगाव परिसरात अचानक आग लागली आणि आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने सिमेंट टँकर मधून आगे चे मोठे मोठे लागले. चालकाने प्रसंगावधान राखत टँकर हा रस्त्याच्या कडेला उभे केला व स्वतःचा जीव वाचवला. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस आणि महामार्ग सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.
आणि अग्निशमन दलाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत सिमेंट टॅंकर हा पूर्णतः जळून खात झाला होता. आगीच्या या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने दोन्ही बाजूंनी वाहतो ही ठप्प झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मोठी वाहतूक कोंडी देखील यावेळी निर्माण झाली होती. आगीचं कारण हे अद्याप अस्पष्ट असून तांत्रिक वेगाने शॉर्टसर्किट किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज हा व्यक्त करण्यात आले आहे. याबाबत पोलीस अग्निशमन विभाग तपास करत आहेत.









