---Advertisement---

जळगावात टाळ, मृदुंग, अभंग आणि भक्तीचा संगम ; संत नामदेव महाराज यांच्या ६७५ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा

---Advertisement---

जळगाव : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 वाजता संत नामदेव मंदिर येथुन भव्य अशा पालखी सोहळ्याला सुरुवात झाली रविकिरण कोंबडे, रवींद्र कापुरे व निकुंभ बाबा यांनी संपत्तनीक पुजा केली.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन करण्यात प्रसिद्ध प्रमुख मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, महिला अध्यक्ष रेखा निकुंभ यांनी पालखीचे पूजन करून भव्य अशा पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सुंदर अशा बग्गीमध्ये संत नामदेव महाराजांची प्रतिमा ठेवून अतिशय सुंदर अशी पालखी सजवलेली होती. तसेच शाळा मृदंगाच्या गजरात अमोदा येतील भजनी मंडळांनी सुंदर असे अभंग, गवळण व नामदेव महाराजांचे गीत सादर केले.

दरम्यान, श्री गुरुद्वारा कमिटीतर्फे संत नामदेव महाराजांच्या पालखीवर गुरुद्वारा कमिटीच्या वतीने पुष्पृष्टी व जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच भाविकांना पाणी आणि फळ वाटप करण्यात आले.

पालखी पंढरपूर चौक, मारुती पेठ, रथ चौक, सुभाष चौक, दाना बाजार मार्गे गुरुद्वारा येथून स्वागत होऊन येथे पालखीचा समारोप झाला. या ठिकाणी दीड हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. पालखी सोहळ्यामध्ये विशेष महिला भगिनींनी सुंदर अशा टाळ मृदुंगावर नृत्य सादर केले. युवक मंडळाने सुद्धा यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश सोनवणे, योगेश सोनवणे, सुरेश सोनवणे, मुकुंद मेटकर, प्रदीप शिंपी, सतीश पवार, अरुण मेटकर, गणेश सोनवणे, दिलीप भामरे, राजेंद्र बाविस्कर, प्रमोद निकुंभ, शरद कापुरे, शैलेंद्र सोनवणे, सतीश जगताप या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सचिव अनिल खैरनार यांनी सूत्रसंचालन केले तर दीपक जगताप यांनी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---