---Advertisement---

आत्महत्याग्रस्त १८ शेतकरी कुटुंबांना अखेर मदतीचा हात! मार्च २०२३ अखेर अनुदान परत गेल्याने जिल्हाभरातील लाभार्थी होते वंचित

---Advertisement---

दीड वर्षापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीतर्फे मदत अनुदान प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते; परंतु मार्च २०२३ अखेर तांत्रिक कारणांमुळे अनुदान निधी शासनाकडे परत गेला होता. परिणामी १८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे मदत अनुदानापासून वंचित होते.

शासन तसेच जिल्हा प्रशासन स्तरावरून अनुदान मंजुरीनंतर या १८ कुटुंबियांना आता डीबीटीव्दारा अनुदान वर्ग करण्यात आले आहे. दीड वर्षापूर्वी २०२३ दरम्यान जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत आत्महत्याग्रस्त १८ शेतकरी कुटुंबांचे मदत अनुदान प्रस्ताव मंजूर होते.

या प्रस्तावांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मंजुरी तसेच त्यासाठी शासन स्तरावरून मार्चअखेर शेवटच्या टप्प्यात निधी प्राप्त झाला; परंतु ‘बीडीएस’ प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या वारसांना वर्ग करतेवेळी तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे आर्थिक वर्षअखेर शिल्लक निधी शासनाकडे परत पाठविण्यात आला होता. त्यामुळे मदत अनुदान मंजूर असूनही या १८ कुटुंबियांना अनुदानापासून वंचित राहावे लागले होते.

आता आत्महत्याग्रस्त १८ शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मंजूर असलेल्या अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त १८ शेतकरी कुटुंबियांमध्ये जळगाव, जामनेर, वरणगाव, पारोळा, चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबियांचा समावेश आहे.

तालुकानिहाय मदत अनुदान प्राप्त वारस

जळगाव तालुका : विजया प्रदीप पाटील (तरसोद), शिवाजी विंधू पाटील (धानवड), अरुण अमृत धनगर (कंडारी),
जामनेर तालुका : मुकेश गोपाळ माळी (टाकळी), काशिनाथ पुरुषोत्तम कुमावत (हिवरखेडे दिगर), भगवान यादव पाटील (पळासखेडा प्र. न.), विश्वनाथ त्र्यंबक वाध कोळी (गोंडखेड)
मुक्ताईनगर तालुका : मधुकर मुरलीधर जगताप (सारोळा)
धरणगाव तालुका : सागर कृष्णकांत माळी (भवरखेडा),
एरंडोल तालुका : अरुणाबाई शरद पाटील (भोद)
पारोळा तालुका : सुभाष पंडित पाटील (टोळी खुर्द), कांतिलाल गोविंदा पाटील (म्हसवे), दीपक बाबूलाल पाटील (दळवेल)
पाचोरा तालुका : प्रेमसिंग सोनसिंग पवार (रामेश्वर), प्रदीप प्रभाकर तुके (कळमसरा)
चाळीसगाव तालुका : विकास धनराज राठोड (शेवरी), वाल्मीक पोपट पाटील (मेहुणबारे), रामभरोस ओंकार राठोड (ब्राह्मणशेवगे) असे अनुदान प्राप्त झाले असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---