जळगावात खंडपीठाच्या अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण निर्णयासंदर्भात मोर्चा

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यास क्रिमिलेयरची मर्यादा लावून आरक्षण देण्याबाबत दिलेल्या निर्णयाच्या संदर्भात आरक्षण बचाव समितीतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व मुकुंद सपकाळे यांनी केले.

जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदनात अनुसूचित जाती जमातीचे स्वतंत्र गट असून त्यांचे विभाजन करता येत नाही असा स्पष्ट निकाल सन 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेला आहे.  हा निर्णय घटनेच्या मूळ रचनेस  हात न लावता देण्यात आलेला असल्याने हाच निर्णय कायम ठेवण्यात यावा. संविधान सभेने अनुसूचित जाती जमातीस आरक्षण दिलेले ते या समाजाच्या आर्थिक मागासलेपणावरून दिलेले नाही तर हजारो वर्षापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेले असल्याने देण्यात आलेले आहे. त्यांचे लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीस पंधरा टक्के तर अनुसूचित जमातीत 7.5% आरक्षण दिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने संविधान सभेच्या निर्णयास तसेच घटनात्मक तरतुदीत धक्का बसला आहे.

 

स्वतंत्र भारताच्या 75 वर्षातील अनुसूचित जाती, जमातीचे शैक्षणिक मागासलेपण मोठ्या प्रमाणावर आहे.  शिक्षणाशिवाय नोकरी वा अन्य शासकीय सवलती मिळत नसल्याने अनुसूचित जाती-जमातीतील एक मोठा वर्ग आपोआप आरक्षणाला मुकणार आहे. वर्गवारी करताना अनेक जात समूहाची अत्यल्प लोकसंख्या असल्याने आरक्षणाचा टक्का सुद्धा निघणार नाही. तेव्हा अशा अल्प समुदायाचा स्वतंत्र गट करणे भाग पडेल असे स्वतंत्र गट जरी झाले तरी त्या प्रगत अप्रगत घटक राहणारच आहेत. तेव्हा अश्या वर्गवारीस काहीच अर्थ उरणार नाही. उलट जातीजातीत वैमनस्य वाढून आताची त्यांच्यातील एकता भंग पावणार असल्याचेही निवेदनात उल्लेख करण्यात आलेला आहे.

मोर्चात मुकुंद सपकाळे, जयसिंग वाघ, सतीश गायकवाड, हरिचंद्र सोनवणे, विनोद रंधे,दिलीप अहिरे, वर्षा शिरसाट, नीलू इंगळे, सुजाता इंगळे, प्रा. प्रीतिलाल पवार, नगरसेवक सुरेश सोनवणे, भाऊराव इंगळे, रमेश सोनवणे, सोमा भालेराव, विजयकुमार मौर्य, अजय बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, जगदीश सपकाळे, योगेश बाविस्कर, दिलीप जाधव, विनोद आढायेंगे, ललित महिरे, श्रीकांत बाविस्कर, प्रकाश दाभाडे, इंदुबाई मोरे, ऍड. राजेश गोयल योगेश बाविस्कर कैलास मोरे, ईश्वर बिऱ्हाडे, लखन बनसोडे, संजय सपकाळे गोपाळ भालेराव, जयपाल धुरंदर, भारत सोनवणे, रवींद्र आखाडे यांच्यासह एरंडोल जळगाव जिल्ह्यातील परिसरातील बहुसंख्येने समाज बांधव मोर्चात सहभागी झाले होते. याप्रसंगी सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले.