अमळनेर : अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकारात वाढ झालेली दिसून येत आहे. अशाच काहीसा प्रकार अमळनेर तालुक्यात उघड झाला आहे. यामुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आश्रम शाळेत सातवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एक अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना बुधवारी (४ जून) रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. ही मुलगी अमळनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे. त्यासंदर्भात मारवाड पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्ष पाच महिने वयाची मुलगी आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. ती सातव्या वर्गात शिकत होती. तिच्या शाळेला सुट्या लागल्या आहेत. यामुळे ती आपल्या मोठ्या बहिणीच्या गावी ये-जा करत होती. दरम्यान, मंगळवारी ( ३ जून ) रोजी ही मलगी तिच्या आई वडीलांसह तिच्या घरीच झोपली होती.
तर बुधवारी (४ जून ) रोजी पहाटे नळाला पाणी येणार म्हणून तिचे आई, वडील पहाटे ३ वाजता उठले असता त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. तसेच तिच्या बहिणीकडे ही विचारणा करण्यात आली. मात्र मुलगी तेथेही मिळून आली नाही. यानंतर तिच्या पालकांना तिला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. सुनील पाटील करत आहेत.