---Advertisement---
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी यंदा सर्व सण-उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेच्या वतीने शहर व परिसरातील सुमारे 30 ठिकाणी सामूहिक गुढी पूजनाचे आयोजन करण्यात आले.
मेहरूण परिसरातील श्रीराम मंदिर येथे झालेल्या गुढी पूजन कार्यक्रमात माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत परिसरातील 50 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर, म्हाडा कॉलनी, मेहरूण येथील दोन ठिकाणी, चौगुले प्लॉट, शिरसोली प्र. नं., यशनगर पिंप्राळा, सम्राट कॉलनी, लक्ष्मी नगर, श्रीराम नगर, रामेश्वर कॉलनी, व्यंकटेश नगर, देविदास कॉलनी, रवंजे येथील महादेव मंदिर, विखरण मधली गल्ली, विखरण खुर्द, खर्ची बुद्रुक, पथराड, फुलपाट (यावल), डोंगरकठोरा, ओंकारेश्वर मंदिर (चोपडा) यासह पाळधी, आव्हानी आणि नांद्रा या ठिकाणीही मोठ्या उत्साहात गुढी पूजन करण्यात आले.
या सर्व ठिकाणी एकूण 500 हून अधिक धर्माभिमानी नागरिकांनी उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली आणि नववर्षाचे स्वागत केले. पर्यावरणाचे भान ठेवून सण साजरे करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.









