रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता; उधना ते संतरागाछी दरम्यान विशेष रेल्वे गाडी धावणार…!

---Advertisement---

 

उन्हाळी हंगामात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना ते संतरागाछी दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि छत्तीसगडमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, विशेषतः सुट्ट्यांच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०९०७३ उधना ते संतरागाछी विशेष गाडी १७ ते २४ एप्रिल या कालावधीत धावणार आहे. प्रत्येक शुक्रवारी आणि बुधवारी सकाळी ११:२५ वाजता उधना येथून सुटल्यानंतर प्रवासादरम्यान विविध महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेत ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९:०० वाजता संतरागाछी येथे पोहचणार आहे.

परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०९०७४ संतरागाछी ते उधना विशेष गाडी १९ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत धावणार आहे. ही गाडी प्रत्येक रविवारी आणि शुक्रवारी पहाटे ०:०५ वाजता संतरागाछी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता उधना येथे पोहोचेल.

या विशेष गाडीला अप आणि डाऊन मार्गावर नंदुरबार, भुसावळ, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झरसुगुडा, राऊरकेला, चक्रधरपूर, टाटानगर व खरगपुर स्टेशनवर थांबे देण्यात येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---