युवकाचे पत्नी आणि प्रेयसीसोबत मद्यप्राशन, अचानक घडलं असं काही…., ऐकून धक्काच बसेल !

---Advertisement---

 

देशभरात अनेक ठिकाणी खळबळजनक हत्येच्या घटना घडत असताना पुन्हा एकदा हादरविणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपुरमध्ये या लव्ह ट्रँगल घटनेचा पोलिसांकडून उलगडा करण्यात आला आहे. एका पुरुषाकडून त्याच्या पत्नी आणि सासर्‍याच्या मदतीने त्याच्या लिव्ह इन पार्टनर अर्थात प्रेयसीची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेमुळे उत्तर प्रदेशातील गोरखपूर हादरलं असून संपूर्ण खळबळ माजली आहे.

सदर पुरुषाने प्रेयसीची चाकूने हत्या करून तिची ओळख लपवण्यासाठी तिचं चेहरा, डोकं ठेचलं आणि तिला विवस्त्र केलं, निवस्त्र असलेला मृतदेह पोलिसांना सापडला मात्र संपूर्ण प्रकरण उलगडणं पोलिसांना कठीण झालं, नंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता एका ऑटो चालकाची भेट घेतली आणि त्या ऑटो चालकाच्या जबाबातून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचता आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची लिव्ह इन पार्टनर हिला 14 वर्षांचा मुलगा आहे, तर आरोपीचं एका महिलेसोबत लग्न देखील झालं आहे आणि त्याला त्या महिलेकडून तीन मुले देखील आहेत या संपूर्ण घडलेल्या प्रकारानंतर रोपी आरोपीची पत्नी आणि सासर्‍याला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपुरच्या पिपिगंज पोलीस क्षेत्रात 30 जानेवारी रोजी एक अज्ञात महिलेचा मृतदेह मिळाला, आणि मृत महिलेचं डोकं हे पूर्णपणे ठेचलेलं होतं व शरीर हे विवस्त्र होतं आणि यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं कठीण झालं. या मृत महिलेचे वय सुमारे 35 वर्षाच्या जवळपास होतं, त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित ऑटो चालक त्यांना सीसीटीव्ही फुटेज मध्ये मिळाला आणि त्या ऑटो चालकाचा शोध घेऊन पोलिसांनी त्याच्याशी विचारपूस केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तीन लोकांना तो या ठिकाणी घेऊन आलेला होता यात दोन महिला आणि एक पुरुष होते असं त्यांनी सांगितलं आणि तिघंही हे दारूच्या नशेत बेधुंद होते आणि ऑटो चालकाच्या दिलेल्या या माहितीनुसार पोलीस हे आरोपी पर्यंत पोहोचले.

आरोपी हा मुंबई येथे प्रायव्हेट विमा कंपनीमध्ये काम करत असून या आरोपीचे नाव विजय साहनी आहे. 2012 मध्ये प्रिया शेट्टी या महिलेबरोबर त्याची कामानिमित्त वारंवार भेट होत होती आणि याच दरम्यान प्रिया आणि विजय यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली आणि दोन्हींनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान त्यांनी एका मंदिरात लग्न देखील केलं आणि प्रिया शेट्टी हिला एक मुलगा देखील झाला जसं वय सद्यस्थितीत 14 वर्ष इतकं आहे, मुलगा जन्माला आल्यानंतर प्रिया आणि विजय यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघेही हे वेगळे झाले त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी घटस्फोटासाठी पत्र देखील दिलं आणि प्रिया शेट्टी हिने भाड्याने घेतलेलं घर हे बदललं त्यामुळे कागदपत्रात अभावी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.

त्यानंतर 2014 मध्ये विजय साहनी याच्या घरच्यांकडून त्याचं लग्न संध्या नावाच्या एका मुलीशी करण्यात आलं आणि लग्नानंतर दोघेही पती-पत्नी हे मुंबईला गेले त्यानंतर पुन्हा प्रिया ही विजयाच्या संपर्कात आली आणि परत त्यांच्यामध्ये वारंवार भेटी होऊ लागल्या त्याच्यानंतर दोन महिने सोबत राहिल्यानंतर ते बाहेर गेले आणि याच दरम्यान विजेच्या पत्नीसह घरच्यांना प्रिया आणि विजय यांच्या नात्याबाबत कळालं त्यानंतर प्रिया शेट्टी लग्नासाठी विजय याच्यावर पुन्हा दबाव टाकू लागली. त्यानंतर 26 जानेवारी रोजी विजय हिची पत्नी संध्या आणि प्रेयसी प्रिया शेट्टी यांना तो घेऊन गोरखपुर आला दरम्यान पत्नी आणि प्रेयसी त्यांना दोघांना दारू पार्टी त्यांनी दिली आणि प्रिया अति मध्य सेवन करत असल्याने त्याला वारंवार धमक्या देत गेली आणि माझ्याबरोबर काही चुकीचं झाल्यास तुझ्या पूर्ण परिवाराला गोरखपुर मध्ये बदनाम करेल अशी धमकी देत गेली.

29 जानेवारी रोजी आरोपी विजय याने गोरखपुर येथून एक ऑटो बुक केला आणि पत्नी आणि प्रेयसी यांच्यासोबत दारू पीत गोरखपूरच्या पिपिगंज येथे गेला. रस्त्यात त्याने ऑटो चालकाला देखील दारू पाजली आणि पिपिगंज येथे ऑटो चालकाने पैसे मागितल्यावर त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. त्यानंतर रिक्षा चालकाला विजयने सांगितले की मी इथलाच आहे आणि पीपीगंज येथे माझ्या सासऱ्याची स्कुटी ही पहिलीच ठेवलेली आहे त्यानंतर पत्नी आणि प्रेयसी हिला स्कुटी वर बसवून तो निघाला आणि रस्त्यात त्यांनी परत दारू पिली आणि त्यानंतर प्रिया शेट्टी वाद करायला सुरुवात केली त्यानंतर त्याची पत्नी संध्या आईने प्रिया हिला शांत केलं आणि प्रिया ही दारूच्या नशेत जमिनीवर लोळू लागले आणि त्यावेळी विजय आणि त्याची पत्नी संध्या यांनी मिळून प्रियाला स्कुटीवर बसवलं. आणि दोघेही जण प्रियाला घेऊन निघाले पुढे रस्त्यात त्यांना बरघट्टा पूल लागला आणि तेथे त्यांनी गाडी थांबून पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली ते ठिकाणी देखील प्रिया हिने वाद घातला त्याच वेळेस विजय साहनी याची पत्नी संध्या हिने हिला मारून टाकलं पाहिजे अस बोलली. त्यानंतर विजय हिने प्रियाचा गळा दाबला आणि ती दारूच्या नशेत बेधुंद असल्याने तिने आरडा ओरड केली नाही आणि तिला मारल्यानंतर दोघांनी मिळून तिचा मृतदेह हा पुलावरून वीस फूट खाली घेऊन गेले आणि त्या ठिकाणी ओळख लपवण्यासाठी दोघांनी मिळून प्रिया हिचा चेहरा व डोकं ठेचलं आणि त्यानंतर तिला विवस्त्र केलं आणि घरी जाऊन झोपी गेले.

त्यानंतर 30 जानेवारी रोजी गोरखपूरच्या पीपिगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर मृत महिला प्रिया हिचा मृतदेह हा पोलिसांना मिळाला मात्र मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी त्यांनी प्रिया हिचा चेहरा व डोकं हे ठेचून टाकलं होतं आणि तिला विवस्त्र केलं त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं हे जिकरीचं होतं, मात्र सीसीटीव्हीच्या आधारे एका ऑटो चालकाच्या जबाबाने या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला,

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---