---Advertisement---
जळगाव : शहरासह जिल्ह्यात आत्महत्या करण्याचा घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात तरुणाच्या आत्महत्येच्या घटनांनी पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक घटना चोपडा तालुक्यातील गलवाडे येथे घडली आहे. गलवाडे गावांत एका तरुणाने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी (२४ जून ) रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राहुल राजेंद्र भिल (वय १९, रा. गलवाडे ता. चोपडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.
---Advertisement---
राहुल भिल हा हातमजुरी काम आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. रविवारी ( २२ जून) रोजी त्याने शेतात गेला होता. यावेळी त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती ग्रामस्थांना कळली. ग्रामस्थांनी तात्काळ राहुल भिल याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
त्याच्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी (२४ रोजी ) राहुल याचा सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. त्याच्या मागे आई, भाऊ, २ बहिणी असा परिवार आहे. या घटनेमुळे गलवाडे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तरुणांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनत चालला आहे.