---Advertisement---
जळगाव : भगवान शंकराप्रती असलेली भक्ती आणि श्रद्धाचे प्रतीक कावड यात्रा मोठ्या उत्सहात पार पडली. भाविकांनी कावड खांद्यावर घेऊन पायी चालत त्यातील पवित्र जल शंकराच्या पिंडीला अर्पण केले. पिंप्राळा परिसरातील जागृत स्वयंभू महादेव, व सुख अमृत नगरातील अर्धनारेश्वर महादेव या मंदिरावर कावड यात्रेकरूनी सावखेडा येथून गिरणा नदीतून तांब्याच्या पात्रता पाणी आणून शंकराच्या पिंडीवर ५०० लिटर जल अर्पण केले.
प्रथम सावखेडा गिरणा नदी जवळ वाळूची पिंड करून पूजा करण्यात आली त्यानंतर गिरणा नदीची पूजा व आरती करून महिला भाविकांनी तांब्याच्या पात्रता पाणी भरले.त्यानंतर सुख अमृत नगर व सोनी नगरातील भाविक चल रे कावरीया भरके घगरीया गाण्यावरथिरकले. सोनी नगरातील जागृत स्वयंभू महादेव मंदिर परिसरातून बुधवारी दुपारी 2.३० वाजता कावड यात्रा सावखेडा येथील गिरणा नदी तेथून आपापल्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण केले.जागृत स्वयंभू महादेव व अर्ध नारेश्वर पिंडीवर ५०० लिटर गंगा जल अर्पण करून अभिषेक करण्यात आले.
सोनी नगरातील महादेव मंदिराचे हे दुसरे वर्ष असून गंगाजल हे पवित्र मानले जाते. कावड यात्रेदरम्यान ते शंकराच्या पिंडीवर अर्पण केल्याने वातावरणाची पवित्रता वाढते, असे नरेश बागडे यांनी सांगितले. ५ किलोमीटर भर उन्हातून कावड यात्रा सोनी नगर येथून सावखेडा गिरणा नदी अडीच किलोमीटर असून परतताना अडीच किलोमीटर असे ५ किलोमीटर भाविक पायदळ कावड यात्रेत सहभागी झाले होते.
सुख अमृत नगरातील अर्ध नारेश्वर महादेव मंदिर येथील महिला भाविकांनी खांद्यावर व डोक्यावर स्टील काळशीत व तांब्याच्या पात्रात गंगा जल आणून अर्ध नारेश्वर शंकराच्या पिंडीवर अर्पण केले. असे मानले जाते की, कावड यात्रा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः श्रावण महिन्यात कावड यात्रा केल्याने लवकर फलप्राप्ती होते. ७५ वर्षाची वयोवृद्ध मंगला बारी या आजीबाईने कावड खांद्यावर घेऊन सकाळी ८ वाजता ५ किलोमीटर एकटी पायदळ भर उन्हात चटके सहन करत हर हर महादेव, बम बम भोलेचा जय घोष करत पिंप्राळा येथील रथ चौकातील महादेव मंदिरात दुपारी ११.३० वाजता शंकराच्या पिंडीवर गंगाजल अर्पण केले.
सोनी नगरातील कावड यात्रेत महिलांनी कावड यात्रा सजवून खांद्यावर घेत हर हर महादेव, बोल बम का नारा ह बाबा हमारा सहारा ह भर उन्हात ही कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व भाविकांनी गंगाजल शंकराच्या पिंडीवर अर्पण केले त्यानंतर
संध्याकाळी ६ वाजता महाआरती कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविक व आशिष सपकाळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नरेश बागडे, मधुकर ठाकरे, विलास निकम, श्रीकृष्ण मेंगडे, विनोद निकम, सरदार राजपूत, डॉ. कमोलखी सरकार, पंकज राजपूत, श्यामलता सरकार, अनिता कापुरे, ओमकार जोशी, उदय महाले, मनोज मेंगडे, सुख अमृत नगरातील महिला मंडळ, यांनी परिश्रम घेतले.