---Advertisement---

धक्कादायक ! खेळण्याच्या बहाण्याने बोलवत केलं ‘हे’ संतापजनक कृत्य, जळगाव जिल्ह्यातील घटना

by team
---Advertisement---

जळगाव : बदलापूर येथील घटनेची आठवण झाल्यास आजही अंगांवर काटा उभा राहतो. या घटनेत नराधमाने शाळेतील चिमुकलींवर अत्याचार केला होता. संपूर्ण राज्यभर या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या घटनेनंतर बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरातील चार जणांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघड होता. एकंदरीत राज्यात महिला व अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातून समोर आला आहे. याघटनेत ३  वर्षीय बालिकेवर सतरा वर्षीय मुलाने खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलवत अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की,  जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असल्याचा संतापजनक घटना शनिवारी घडली आहे. हा अत्याचार दहावीत शिकाऱ्या विद्यार्थ्याने केला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय मुलावर पोक्सो कायद्यांर्गत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला आहे. ही चिमुकली आपल्या कुटुंबासह राहत आहे. तिच्याच गावात राहणाऱ्या १७  वर्षोय मुलाने तिला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेले, व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी रडत रडतचं घरी गेली व तिने झालेला सर्व घटना आईला सांगितली. ही घटना ऐकताच पिडीत मुलीच्या आईने थेट भडगाव पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी विधी संघर्षीत मुलावर गुन्हा दाखल करून घेतला. या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करत आहेत.

महिला सुरक्षेतच प्रश्न ऐरणीवर

महिला सुरक्षा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय बनला आहे, जो समाजात मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. समाजातील अनेक स्तरांवर महिला अत्याचार, छळ, लैंगिक हिंसा, तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात असुरक्षिततेचे मुद्दे ऐरणीवर आहेत. यामुळे महिला आणि त्यांच्या संरक्षणाबाबत अनेक कायदेशीर, सामाजिक, आणि सांस्कृतिक प्रश्न निर्माण झाले आहेत.

भारतात आणि इतर देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे, योजना आणि चळवळी कार्यरत आहेत. तरीही, महिलांवरील अत्याचार, छळ आणि हिंसा कमी होण्याची प्रक्रिया धीमी आहे. महिला सुरक्षेसाठी सरकारने अधिक कठोर कायदे, पोलिसांमध्ये प्रशिक्षणे, तसेच सामाजिक जनजागृती साधने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे, महिला सुरक्षेच्या संदर्भातील प्रश्न सतत ऐरणीवर असतात आणि त्यावर ठोस उपाययोजना, जागरूकता आणि सशक्त धोरणांची आवश्यकता आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment