---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथे शेती साहित्यावर मिळणारी सबसिडी मंजूर करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उप कृषी अधिकार्यासह तिघांना जळगाव एसीबीने अटक केल्याने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत. यात उप कृषी अधिकारी लीलाधर शिवाजीराव देशमुख तसेच खाजगी व्यापारी संजय प्रभाकर पाटील व खाजगी पंटर नितीन इंदलसिंग निकम अशा अटकेत असलेल्या तिघांची नावे आहेत.
पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील एका शेतकऱ्याने शासनाच्या योजनेअंतर्गत नांगर आणि रोटर खरेदी केले होते. आणि या शेती साहित्यावर शासनाकडून अनुदान मिळत असल्याने त्यांनी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला व साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करून अनुदान मंजूर करून देण्यासाठी उप कृषी अधिकारी लीलाधर देशमुख यांनी ६ हजारांची लाच मागितली मात्र यात तडजोड करून ५ हजार रुपये देण्याचं ठरलं. या नंतर तक्रारदाराने जळगाव एसीबी कडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला. उप कृषी अधिकारी लीलाधर देशमुख यांनी लाचेची ही रक्कम आंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचे मालक संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले होते. मात्र तक्रारदार दुकानावर गेले असता, संजय पाटील हे दुकानावर नव्हते मग त्यांच्या सांगण्यावरून दुकानातील मदतनीस खाजगी पंटर नितीन निकम याने पाच हजारांची लाच स्वीकारल्याने त्यास अटक करण्यात आली व नंतर त्या दोघांना अटक करण्यात आली.
एसीबीच्या या पथकात जळगाव एसीबीचे उपाध्यक्ष योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील चालक सुरेश पाटील प्रदीप राकेश दुसाने त्यांनी हे यशस्वी केला आहे.









