मोठी बातमी ! जळगावात निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात

जळगाव । रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या खासगी गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील जखमींना चोपडा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर विधानसभा मतदार संघात मतदारसंघातील Other polling officer म्हणून नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्रा. शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले, कविता बाविस्कर,
लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला अपघात झाला.

हा अपघात आज मंगळवारी सकाळी किनगाव बु. जवळ झाला. या अपघातातील जखमींना उपचारार्थ चोपडा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा सोमवारी सायंकाळी ६.०० वाजता थांबला. उद्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

आयटीबीटी, सीआरपीसह अतिरिक्त पोलीस बल तैनात 
जळगाव जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांतता, सौहार्दपूर्ण, निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी मतदान केंद्र, सेक्टर पेट्रोलिंग, महसूल झोन पेट्रोलिंग, बॉर्डर सिंलिंग, स्ट्रांग रूम असे कायदा सुव्यवस्थेंतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.