---Advertisement---

Accident News : मजूरांवर काळाचा घाला : घाटात मालवाहू टेम्पो पलटी होऊन एक ठार, २२ जखमी

---Advertisement---

Accident News रावेर : फैजपूर येथून मध्य प्रदेशामध्ये जात असलेल्या मजुरांच्या मालवाहू टेम्पोचा पाल येथील एका घाटामध्ये गारबर्डी गावाजवळ अपघात झाला. हा टेम्पो घाटामध्ये पलटी झाला. या अपघातील एक जखमी तरुणाचा जळगावत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावसह इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. रावेर पोलीस स्टेशनला अपघाताच्या घटनेची नोंद घेण्यात आली आहे. अनिल उर्फ अरविंद माका बारेला (वय १९, रा. मलगाव कोठा, ता. जिरण्या जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे.

फैजपूर येथे मलगाव कोठा गावचे काही मजूर हे मजुरी काम करण्यासाठी आले होते. त्यांचे काम पूर्ण झाल्याने ते आपल्या गावाकडे बुधवारी ( ४ मे) रात्री ८ वाजता परतत होते. या परतीच्या प्रवासादरम्यान रावेर तालुक्यातील गारबर्डी गावाजवळ असलेल्या एका घाटामध्ये गारबडी सुकी धरणाजवळील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटुन वाहन झाडावर जाऊन  उलटले. रात्रीच्या अंधारात हा प्रकार घडल्याने कोणालाही समजले नाही. या अपघाताची घटना ग्रामस्थांना घटना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती कळविली. यानुसार मिळेल त्या वाहनाने जखमींना पाल येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. तर, ७ जणांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अनिल बारेला याचा मृत्यू झाला आहे. अनिल बारेला याच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. मजुरी काम करून त्याचा परिवार कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान अनिलच्या मृत्यूमुळे रुग्णालयात पित्याला शोक अनावर झाला होता. घटनेबद्दल रावेर पोलीस स्टेशनला नोंद घेण्यात आली आहे तर अनिल बारेला याच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या अनेक अपघातांमुळे जळगाव जिल्हा दिवसभर चर्चेत राहिला. अनिल बारेला याच्या मृत्यूमुळे मलगाव कोठा गावामध्ये शोककळा पसरली आहे.

या अपघातात जखमींची नावे खालील प्रमाणे :
भुरीबाई नवा बारीला (वय १८), चालक धरम नरोम सिसोदिया (वय २०), नुस्तीबाई रिछू भिलाला (वय ५५), सुमलीबाई प्रेमसिंग बारेला (वय ५०), लाडकीबाई रीछू भिलाला (वय ३०), लक्ष्मी सोमसिंग बारेला (वय १६), , रूपा कालू बारेला (वय १६), शेवता वेसासिंग बारेला (वय २५), दयाराम कालू बारेला (वय २०), (केसीएन) पार्वती मधू बारेला (वय १२), सविता रामदास बारेला (वय १४) आशा मधू बारेला (वय १६), विकास वेचता बारेला (वय १५), हिरालाल गोरालाल बारीला (वय ३०), सुभान कीछू बारेला (वय ३२), सुरेश चेनसिंग भिलाला (वय १८), विजय अशोक बारेला (वय १५), सायली होवळसिंग बारेला (वय १५), रंजीता संजू बारेला (वय १४), भुरी गोडा बारेला (वय १८) रघुवीर कालू बारेला (वय १८, सर्व रा. कोठा, ता. जिरण्या जिल्हा खरगोन, मध्यप्रदेश) अशी जखमींची नावे आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment