---Advertisement---
चाळीसगाव : येथील आनंद नगर चेतन दुग्धालय समोर रविवारी (२९ जून ) रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास चाळीसगाव- नांदगाव रोडवरील खडकी बु बायपास येथे भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आबा जानराव (धनगर) (वय 35 वर्ष) असे मयताचे नाव आहे. तर त्यांच्या सोबत असलेले भगवान कोल्हे (वय 26 वर्ष) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातानंतर खडकी ग्रामस्थ संतप्त भावना व्यक्त करीत रस्त्यावर उतरले होते. यावली त्यांनी रस्ता रोको आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहनांची रांग लागली होती. यावेळी शहर पोलिस व वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.
---Advertisement---
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे. आबा गंगाराम जानराव(धनगर) यांच्या पश्चात, आई, दोन भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी देखील गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत कठोर भूमिका घेतली. तसेच या रस्त्यावर वेगमर्यादा, वाहतूक नियमन व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.