भुसावळ नगर परिषदेत राजकारण तापलं; तुरटी घोटाळ्यावरून भाजप-राष्ट्रवादी शरद पवार गटात आरोप-प्रत्यारोप….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेत सध्या राजकारण चांगलेच तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाणीपुरवठा विभागातील तुरटी खरेदी प्रकरणावरून हा वाद अधिकच चिघळला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या सत्ताकाळात भुसावळ नगर परिषदेत पाणीपुरवठा विभागासाठी करण्यात आलेल्या तुरटी खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आर्थिक अनियमितता झाल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र या आरोपांनंतर भाजपकडूनही तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार करण्यात आला. भाजपच्या नगराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी चौधरी यांच्यावर टीका करत, ज्यांनी स्वतःच्या कारकिर्दीत घोटाळे करून जनतेचा विश्वास गमावला, तेच आता आरोप करत असल्याचे म्हटले.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, जर चौधरी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर त्यांनी ठोस पुरावे जनतेसमोर मांडावेत. अन्यथा केवळ राजकीय हेतूने केलेले आरोप जनता स्वीकारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या आरोप-प्रत्यारोपांमुळे भुसावळ नगरपरिषदेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक पातळीवर या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वाद सुरू असून आगामी काळात हे प्रकरण आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---